Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती,विजयाताई विठ्ठलानी यांनी माननीय शिवसेना पक्षप्रमुख...

गडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती,विजयाताई विठ्ठलानी यांनी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री,उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतले

98
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0013.jpg

गडचिरोली जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती,विजयाताई विठ्ठलानी यांनी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री,उद्धवजी ठाकरे यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतले                                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
श्रीमती,विजयाताई विठ्ठलानी यांचा शिवसेनेत प्रवेश…
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांच्या हस्थे शिवसेनेत जाहीर प्रवेश

अहेरी विधानसभा आलापल्ली येथील माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला. असून त्यांच्याकडे पक्षातील महिलाचे संघटन वाडीसाठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे
बुधवार 18 मे रोजी माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री ना.एक एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केले.
ठाणे येथील ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या निवासस्थानी दस्तुरखुद्द शिवसेनेचे नेते तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी स्वतः विजया विठ्ठलानी यांच्या हातात शिवबंधन बांधून गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा टाकून हाती भगवा झेंडा दिले श्री विजया विठ्ठलानी यांच्याकडे पक्ष वाढीसाठी व संघटन मजबुतीसाठी लवकरच अहेरी अहेरी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हाचे शिवसेनाचे जिल्हा संपर्कप्रमुख किशोर चंद्रकांत पोतदार तसेच अहेरी विधानसभेचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री,रियाजभाई शेख साहेब, यांच्या अथक प्रयत्नातून माजी जिल्हा परिषद सदस्या विजया विठ्ठलानी यांनी शिवसेनेचा भगवझेंडा व धनुष्यबाण हाती घेतले आहे.
आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी विजया विठ्ठलानी यांचे पक्ष प्रवेश शिवसेनेसाठी लाभदायक असल्याचे संकेत असून या आधी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मुरब्बी राजकारणी म्हणून विजया विठ्ठलानी यांची ओळख आहे.
पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाजभाई शेख,आरमोरी विधानसभेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंग चंदेल तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख धर्मराज रॉय हे ही उपस्थित होते शिवसेनेचे इतर पदाधिकारी पण उपस्थित होते.

Previous articleशासन निर्णयाची अंमलबजावणी करून जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा
Next articleकमलापूर, पातानील येथील हत्तींचे स्थलांतर रोखण्याकरिता जिल्ह्यातील युवकांची ना.बचू कडू  यांचे कडे मागणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here