
राजेंद्र पाटील राऊत
आ. सुधिर मुनगंटिवार यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्याची घोषणा.अपघातातील त्या मृतांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत जाहीर।
चद्रपुर/गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): चद्रपुर-मुल महामार्गावर अजयपुर येथे झालेल्या डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेल्या ट्रक यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यमंञी सहाय्यता निधितून देण्याची मागणी माजी अर्थमंञी आ.सुधिर मुनगंटिवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती.आ.मुनगंटिवार यांच्या मागणीच्या अनुषंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निधितुन मृतकांच्या कुंटुबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची घोषणा केली आहे.
अजयपुर गावाजवळ झालेल्या भिषण अपघातादरम्यान मोठी आग लावुन 9 मजुरांना भाजुन मृत्यू झाला होता.या अपघातानंतर आ.सुधिर मुनगंटिवार यांनी मुख्यमंत्र्यांना पञ पाठवुन मुख्यमंत्री निधितुन मृतकांच्या कुंटुबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची मागणी केली होती.मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव श्री विकास खारगे यांच्याशी याबाबत चार्च देखील केली.जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट गेत आ.सुधीर मुनगंटिवार यांनी तातडीने याबाबत प्रस्ताव शासनाला पाठविण्याची विनंती केली.आ.मुनगंटिवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मृत्यकांच्या कुटूबियांना मुख्यमंत्री सहाय्यक निधितून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहायक देण्याची घोषणा केलेली आहे.