Home गडचिरोली दोन जहाल नक्षलवाद्यांनी केला आत्मसमर्पण!! १२ लाख रू. ईनाम असलेल्या २ जहाल...

दोन जहाल नक्षलवाद्यांनी केला आत्मसमर्पण!! १२ लाख रू. ईनाम असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांचे नक्षली खुनी विचारधारेला कंटाळून आत्मसमर्पण .

59
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220512-WA0057.jpg

दोन जहाल नक्षलवाद्यांनी केला आत्मसमर्पण!!
१२ लाख रू. ईनाम असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांचे नक्षली खुनी विचारधारेला कंटाळून आत्मसमर्पण .
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):नामे कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा, वय २७ वर्ष रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी वय ३० वर्ष रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

आत्मसमर्पत सदस्याबाबत
माहीती

नामे- कोल ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा

दलममधील कार्यकाळ

१) कोलु पदा हा माहे सप्टेंबर २०१० रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. २) माहे नोव्हेंबर २०११ ते सन २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होता.
३) त्यानंतर माहे जुलै २०१७ ते डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्र. १० मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता.

कार्यकाळात केलेले गुन्हे

१) कोलु पदा याचेवर ०३ खून, ०७ चकमक, ०१ दरोडा असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. (२) नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी ०३ अॅम्बुश लावले होते.
३) त्याने लावलेल्या छत्तीसगडमधील मोजा अवालवरसे (छ.ग.) महाराष्ट्रामधील मोजा झारेवाडा, पोयारकोठी, अॅम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.
४) त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये सन २०२० रोजी गडचिरोली जिल्ह्यातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात १ पोलीस अधिकारी व ०१ पोलीस जवान शहीद झाले होते.

नामे- राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी

दलममधील कार्यकाळ

१) माहे फेब्रुवारी २०११ मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती.
(२) माहे सप्टेंबर २०१२ ते माहे डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
(३) गडचिरोली जिल्ह्यातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या अॅम्बुशमध्ये १ पोलीस अधिकारी व ०१ पोलीस जवान शहीद झाले.

कार्यकाळात केलेले गुन्हे

१) राजे उसेंडी हीचेवर ०१ खून, ०४ चकमक, ०१ जाळपोळ असे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत… २) सन- २०१९ रोजी मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात तिचा सहभाग होता.
आत्मसमर्पत होण्याची कारणे

१) नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून महिला व मुले यांना वाईट वागणूक मिळत असल्यामुळे.
२) जंगलामध्ये असंख्य मेलाचा प्रवास पायी करावा लागत असल्यामुळे.
३) जनतेचा नक्षलवाद्यांना पाठींबा मिळत नसल्यामुळे.
४) दलममध्ये अवजड ओझ्याची कामे फक्त महिलांना दिली जातात, त्यांना इतर बाबतीत सहभागी केले जात नाही.
५) दलममध्ये नसबंदी करून पती-पत्नीला इतर दलममध्ये वेगवेगळे ठेवत असल्यामुळे.
६) पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाल्यामुळे.
७) वरिष्ठ कॅडर व कनिष्ठ कॅडरमध्ये मुलभूत सुविधांसाठी भेदभाव केला जात असल्यामुळे.
८) वरिष्ठ माओवाद्यांकडून वैद्यकीय कारणासाठी पैसे दिले जात नसल्यामुळे.
९) महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत होवून आत्मसमर्पण केल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेले बक्षीस

१) महाराष्ट्र शासनाने कोलु पदा याचेवर ८ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
२) राजे उसेंडी हिचेवर ०४ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

३) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडुन कोलु पदा वास ३.५० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

४) आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडुन राजे उसेंडी हीला २.५० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. ५) पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पणानंतर अतिरिक्त १.५० लाख असे एकुण ७.५० लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकुण ४७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here