Home वाशिम अनसिंग येथील कापड मार्केटमध्ये कचऱ्याचे व धुळीचे साम्राज्य

अनसिंग येथील कापड मार्केटमध्ये कचऱ्याचे व धुळीचे साम्राज्य

118
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220509-WA0023.jpg

अनसिंग येथील कापड मार्केटमध्ये कचऱ्याचे व धुळीचे साम्राज्य

वाशिम : (रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्यूज)-
अनसिंग येथील मार्केट लाईनच्या रोडला कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. या बाजारपेठेत बावन खेड्यातील लोक येतात त्यांना धुळीचे व कचऱ्याचा सामना करावा लागत आहे. तसेच दुकानदारांना सुद्धा यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ नाका-तोंडात जात असल्यामुळे घसा दुखी, घसा बसणे, श्वास गुदमरणे अशा आजारांना समोर जावे लागत आहे. अनसिंग हे गाव 18 हजार लोकसंख्येचे गाव असून त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामपंचायत अतिक्रमण धारकाकडून रोजची दहा रुपये बैठक घेत असते आणि बुधवारच्या दिवशी तीस रुपये अशी बैठक घेत असते तर त्याचा मोबदला म्हणून मार्केटचे रोड पूर्णपणे रोजच्या रोज कामगारांन मार्फत साफ करावे अशी मार्केट लाईनच्या सर्व दुकानदार यांची अपेक्षा. ग्रामपंचायत ने त्याच्याकडे लक्ष द्यावे व सर्व मार्केट लाईनच्या दुकानदारांना व व्यापाऱ्यांना सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here