Home नांदेड उन्हाळी सत्राच्या परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात – माणिक मोरे.

उन्हाळी सत्राच्या परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात – माणिक मोरे.

63
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220502-WA0052.jpg

उन्हाळी सत्राच्या परिक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात – माणिक मोरे.

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील( युवा मराठा न्युज)

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा एक ज्वलंत प्रश्न आपणास आढळून येत आहे महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यापीठातील परीक्षा ह्या ऑनलाईन झाल्या पाहिजेत ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची मागणी आहे, मी फार्मसी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा देतो . ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचा विद्यापीठाने घेतलेला निर्णय बदलायला हवा. ऑफलाईन होत असलेल्या परीक्षा हे ऑनलाईन पद्धतीने घेतल्या पाहिजेत . कारण आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले असून परीक्षासुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच घेतल्या पाहिजेत अशी आमची मागणी राज्य सरकारकडे आहे. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात यासंबंधीची मागणी असून संबंधित मागणीचा विचार व विद्यार्थ्यांचा विचार करून राज्य सरकारने ऑफलाईन होत असलेल्या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घ्याव्यात.
फार्मसी कृती समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माणिक मोरे यांनी सदरील मागणीचे निवेदन महाराष्ट्र चे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय उदय सामंत यांना निवेदन दिले आहे. सदरील निवेदनात महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आपल्या निर्णयामुळे त्रस्त आहेत या सत्राची परीक्षा ऑनलाईन हवी आहे , आपणास विनंती आहे सर्व विद्यापीठाच्या कुलगुरू सोबत चर्चा करून आपण होऊ घातलेल्या परीक्षा ऑनलाईन कराव्यात अशी मागणी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here