Home गडचिरोली देशाची व शेतक-यांची सेवा करणारी संस्था म्हणजे श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी...

देशाची व शेतक-यांची सेवा करणारी संस्था म्हणजे श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्था – माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी

33
0

राजेंद्र पाटील राऊत

देशाची व शेतक-यांची सेवा करणारी संस्था म्हणजे श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्था – माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ नामदेवराव उसेंडी

भाकरोंडी येथे क्रांतिवीर कंगला माझी सरकार जण जागरण परिषद

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) जिल्हयातील आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी येथे तीन दिवसीय श्री. मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्थेची परिषद भरवलेली होती. आंतरराष्ट्रीय समाजवाद संस्थेची स्थापना क्रांतीवीर हिराजी देव उर्फ कंगाला मांझी यांनी स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची समता सैनिक दल याच आधारावर श्री. मांझी समाजवाद संस्थेची स्थापना झालेली असून याचा मुख्य हेतु देशातील आदिवासींनी शेती करतानांच इतर फावल्या वेळात सैनिकी पोषाख धारण करुन देशात कुठल्याही भागात धार्मिक दंगे, दुष्काळ, पुर परिस्थिती, भुकंप आल्यास त्या ठिकाणी जावून सामान्य नागरिकांना मदत करणे, शातंता प्रस्तापित करणे हा उद्देश कंगला माझी सरकारचा आहे. या सैनिक संस्थेत सैनिकी व्यवस्थेप्रमाणे वेगवेगळे कॅडर असून त्यांना विशिष्ठ आजाद हिंद सेनेप्रमाणे पोषाख परिधान करण्याची मुभा आहे. या संघटनेला देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु, पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी या सैनिक संघटनेचे कार्याशी प्रभावीत होवून वेळोवेळी या संघटनेला प्रोत्साहित केलेले होते. या संघटनेचे देशात एकंदरीत 18 लाख नोंदणीकृत सदस्य असून सद्या परिस्थितीत 3 लाख सैनिक पोषाखधारी व सर्वसाधारण पोषाखधारी सक्रीय कार्यरत आहेत. या संघटनेच्या सद्याचे अध्यक्ष राजमाता श्रीमती फुलवादेवी कांगे असून त्या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळया आदिवासी भागात संघटन वाढविण्याचे काम करीत आहे. या संघटनेच्या माध्यमातुन आदिवासी भागातील नागरिकांवर होणारे अन्याय, अत्याचार विरोधात शासनाकडे दाद मागण्याचा काम होत आहे. त्याप्रमाणे आदिवासी पंरपंरा, संस्कृती, धार्मीक विधी याची जोपासना करण्याची काम सुध्दा या संघटनेच्या मार्फतीने होत असते. या तीन दिवसीय सभेच्या समारोपिय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आमदार तथा महासचिव महा.प्रदेश काॅग्रेस कमिटी डॉ नामदेवराव उसेंडी यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. या कार्यक्रमात बोलतांना माजी आमदार डाॅ. उसेंडी म्हणाले की, श्री मांझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्था ही देशातील शेतकरी व नागरिक यांची सेवा करणारी संस्था असून देशामध्ये शांतता स्थापित करण्यासाठी बहुमुल्य कार्य या संस्थे मार्फत केल्या जात आहे हे अतिशय अभिनंदनीय बाब आहे. सविधानिक मुल्य मानवी हक्क व अधिकार यांची जोपासणा करण्यासाठी या संघटनेचे गावागावात सदस्य होणे काळाची गरज असून सद्या देशात धर्म व्देष, वंश व्देष, जाती व्देष निर्माण करुन देशात अशांतता माजवण्याचे जे प्रकार आहेत त्याला आढा घालण्यासाठी मानवतेवर आधारीत समाजवादी सैनिक संस्था मजबुत करणे काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेच्या अध्यक्षा राजमाता श्रीमती फुलवादेवी कांगे व यांचे सुपुत्र संघटनेचे उपाध्यक्ष कुमदेव कांगे, संस्थेच्या कायदेविषयक सल्लागार सु. श्री. राजकुमारी अॅंड. कांगे, सौ. यशोधरा उसेंडी, संस्थेचे सल्लागार श्री. उइके, गडचिरोली जिल्हयातील सैनिक दलाचे प्रमुख अंबरशहा दुग्गा, सचिव गणितराव पारसा, दलपत मडावी, सोमजी आतला, रामसिंग कल्लो, आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleअहेरी आलापल्ली येथील शासकिय मुलांचे वसतीगृह सुरू करा।
Next articleमृतक पोलिस जवान हितेश भैसारे यांची सुराईड नोट वायरल, मृत्युला वरिष्ट अधिकारी कारणीभुत असल्याचे नमुद। पोलिस विभागात खळबळ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here