
राजेंद्र पाटील राऊत
नॅशनल कराटे स्पर्धेत अनसिंग च्या खेळाडूंचे यश. मंगरूळपीर,(रितेश गाडेकर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
12 व 13 मार्च रोजी वाशिम येथे ट्रेडिशनल & स्पोर्ट्स शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने ओपन नॅशनल लेवल कराटे स्पर्धा पार पडल्या. सदर कराटे स्पर्धा ह्या जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे घेण्यात आल्या.या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. वाशिम मधील 120 विद्यार्थी हे सेन्सई निखिल देशमुख यांच्या मार्गर्शनाखाली सहभागी झाले होते. त्यामध्ये अनसिंग येथील 4 विद्यार्थी हे सेन्सई प्रसाद मांडवगडे सर यांच्या मार्गर्शनाखाली सहभागी झाले होते. यामध्ये सर्वेश उदय वाळली याने काता या प्रकारात सुवर्ण पदक तर कुमीते प्रकारात राजत पदक प्राप्त केले.सार्थक गजानन खरात याने काता या प्रकारात सुवर्ण पदक पटकवले. सिनीयर गटात रविकांत पांडुरंग वाबळे ह्याने काता प्रकारात कास्य पदक पटकावले. तसेच सेन्सई प्रसाद मांडवगडे यांनी ब्लॅक बेल्ट काता मध्ये तृतीय स्थान प्राप्त केले.
त्यात महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले व अनसिंग ला बेस्ट टीम चे पारितोषिक आणी ट्रॉफी मिळाले. या राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन असोसिएशन चे अध्यक्ष शीहान सुनील देशमुख सर आणि शीहान सचिन कोकने सर यांनी केले.