
राजेंद्र पाटील राऊत
अपंग बांधवांना पाच टक्के निधी नगरपालिका व ग्रामपंचायतने खर्च करावा
मालेगाव:-(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) समाज कल्याण अधिकारी यांना दिले निवेदन.
नगरपालिका व ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अपंग बांधवांसाठी खर्च करावा व घरकुल योजनेमध्ये पाच टक्के घरकुल व ज्यांना जागा उपलब्ध नाही त्यांना पाच टक्के निधीतून भूखंड विकत घेऊन त्यावर अपंग बांधवांसाठी घरकुल बांधण्यात यावे.याबाबत अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने समाज कल्याण जि.प.वाशिम यांना 14 मार्च ला दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.
अखिल भारतीय अपंग कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून अपंग बांधवांना न्याय देण्याचे काम चालू असते त्यामुळे अपंगांना नगरपालिका ग्रामपंचायत उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अपंग बांधवांसाठी त्वरित खर्च करावा ,यासाठी आणि घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी पाच टक्के प्रमाणे अपंग बांधवांना लाभ देण्यात यावा व जागा उपलब्ध नसल्यास भूखंड विकत घेऊन घरकुल द्यावे, तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा प्रचार व प्रसार करून आलेले प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत, याबाबत निवेदन मा.राष्ट्रीय उप अध्यक्ष श्री. शिवाजी शेषराव नवगणकर यांनी दिले आहे.