Home बुलढाणा वानखेड गावात पहिला पी, एस आय.

वानखेड गावात पहिला पी, एस आय.

208
0

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड गावात पहिला पी, एस आय.
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावात पहिला पी, एस, आय बनण्याचा मान हरिदास पांडुरंग हागे यांनी पटकावला असून संपुर्ण गावच्या वतीने त्यांची प्रशंसा केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की वाण नदीच्या तीरावर वसलेल्या वानखेड येथील शेतकरी पांडुरंग हागे हे वानखेड येथे शेती करतात काबाळ कष्ट करून त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित बनवलं शिवाय मुलीलाही उच्च शिक्षण दिलं.
त्यामुळे मोठा मुलगा पुण्यात नौकरी करतो तर हरिदास याने ही उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी केली. या परीक्षेच्या माध्यमातून तो पी, एस, आय पदापर्यंत पोहचला आहे.
बारी समाजातील वानखेड गावातून पी, एस आय झालेला हा पहिला तरुण ठरला आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे गावाचे, जिल्ह्याचे नाव वाढीस लागले आहे. समाजाचा एक तरुण मोठ्या पदावर पोहचल्याने इतर तरुणांनाही आता यामुळे प्रेरणा मिळण्यास वाव तयार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here