
राजेंद्र पाटील राऊत
भोर वेल्हा मुळशीचे कार्यसम्राट आमदार भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) मा.श्री.संग्रामदादा थोपटे यांच्या मागणीनुसार राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून मंजूर करण्यात आलेल्या वेल्हा तालुक्यातील महाड – मढेघाट – वेल्हा – नसरापूर – चेलाडी या रस्त्याच्या रूंदीकरणास सुधारणा करणे या कामासाठी रू.१५ कोटी ८१ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या रस्त्याची आमदार संग्रामदादा यांनी पाहणी केली, या मार्गावरील भट्टी खिंड व केळद खिंड फोडून या रस्त्याचे ५५० मीटर रूंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे या रस्त्याची आज प्रत्यक्ष पाहणी करून या कामाच्या संदर्भात अधिका-यांना याबाबतच्या सुचना देण्यात आल्या…
तसेच वेल्हा पोलिस स्टेशनच्या इमारतीच्या बांधकामाकरीता रू.२ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध केला आहे याही कामाचा आढावा घेतला व सदरल कामे लकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी वेल्हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री.नानासो राऊत, वेल्हा पंचायत समितीचे सभापती श्री.दिनकर आण्णा सरपाले, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.दिनकरराव धरपाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.भोसले, उपअभियंता संकपाळ, पोलिस निरिक्षक श्री.मनोज पवार यांचेसह वेल्ह्याचे सरपंच श्री.संदिप नगिने, वांगणीचे उपसपंच श्री.शिवाजी चोरघे, श्री.विशाल वालगुडे इ.उपस्थित होते.