Home नांदेड महाशिवरात्रीनिमित्त बेटमोगरा येथे पालखी मिरवणूक व बिल्वर्चन बेल सोहळा उत्साहात साजरा.

महाशिवरात्रीनिमित्त बेटमोगरा येथे पालखी मिरवणूक व बिल्वर्चन बेल सोहळा उत्साहात साजरा.

93
0

राजेंद्र पाटील राऊत

महाशिवरात्रीनिमित्त बेटमोगरा येथे पालखी मिरवणूक व बिल्वर्चन बेल सोहळा उत्साहात साजरा.

नांदेड /मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बेटमोगरा हे हिंदू-मुस्लीम एकात्मतेचे प्रतीक असलेले ऐतिहासिक असे गाव आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवलिंग बादशहा मठ संस्थांचे मठाधिपती श्री सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्या अधिपत्याखाली दि.१ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. व दि.२ मार्च रोजी बिल्वर्चन बेल सोहळा अतिशय आनंदाने मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा झाला.
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख असा सण आहे.
महाशिवरात्रि हा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात शिवभक्त साजरा करतात. त्याच अनुषंगाने हिंदू-मुस्लीम समाजा चे श्रद्धास्थान असलेल्या बेटमोगरा येथील शिवलिंग बादशहा मठ येथे महाशिवरात्रीनिमित्त पालखी मिरवणूक व बेल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही पालखी मिरवणूक शिवलिंग बादशहा मठातून प्रस्थान होऊन गावागावातील मुख्य मार्गाने शेजारील टाकळी व चिटमोगरा या गावांना भेटी देत मन्याड नदी मार्गे
छत्रपती(कल्याणपुर महादेव मंदिर) परिसरात महापूजा व आरती करण्यात आली. व तेथून गावातील मुख्य चौकातून शिवलिंग बादशहा मठ संस्थान मध्ये ही पालखी विराजमान करण्यात आली. या पालखी सोहळ्यात बेटमोगरा परिसरातील व जिल्हाभरासह विविध ठिकाणाहून भाविक भक्त या पालखी मिरवणूक व बेल सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मिरवणुकीनंतर दि.1 मार्च रोजी रात्री ठिक ८:०० वा.च्या दरम्यान
इष्टलिंग महापूजा व शिव जागर करण्यात आले. त्यानंतर दि.२ मार्च रोजी सकाळी दहा वाजता सामूहिक इष्टलिंग महापुजा व दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान बिल्वर्चन सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here