राजेंद्र पाटील राऊत
नगर परिषद जिं तूर अंतर्गत घरकुलच्या (डी. पी. आर.) ३ च्या पहिल्या हपत्याचा निधी मंजूर
माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रयत्नांना यश
जिंतूर (विष्णू डाखुरे तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क): नगर परिषद जिंतूर
अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे डी.पि.आर. -३च्या पहिल्या हप्त्याचा निधी माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मंत्री जितेंद्र आव्हाड, गृह निर्माण मंत्री यांच्या मार्फत मंजूर करण्यात आला आहे.
यात प्रधानमंत्री आवास योजनेचे डी.पि.आर.-३ मध्ये ७०० घरकल मंजूर असून ु यापैकी ३१६ लाभार्थ्यांना पहिल्या हपत्याचे प्रत्येकी चाळीस हजार असे १ कोटी २७ लक्ष रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. तर डी.पि.आर-१ व डीपीआर-२, मधील २ रा,३ रा व ४ थ्या हपत्याच्या ७० लाभार्थ्यांचे एकूण ३२ लक्ष रु. वाटप करण्यात येणार आहेत. माजी आमदार विजय भांबळे यांनी सरकार कडे पाठपुरावा करून सदर निधी तात्काळ मंजूर करून घेतला आहे. प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डी.पि.आर.- 3 मध्ये ७०० घरकुल मंजूर केले असून प्रत्येकी २.५० लक्ष रु. अनुदान
वाटप करण्यात येणार आहे. जिंतूर शहरात डी.पि.आर.-१ व
डी.पि.आर.-२ अंतर्गत आज पर्यंत १२५० घरकुल मंजूर करण्यात आले असून. ५६० घरकल पू ु र्ण झाले असून ५०९ घरकुल प्रगतीपथावर आहेत तर डीपीआर -३ मध्ये ७०० घरकुल मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिंतूर शहरास आजपर्यंत१९५१
घरकुल मजूर झाले आहेत. नगर परिषद जिंतूर येथे सर्वात जास्त घरकुल मंजूर करण्यात आले
असून सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. सदर लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच हि अनुदान रक्कम नगर परिषद जिंतूर यांच्याकडून वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यामधून समाधान व्यक्त होत आहे.