राजेंद्र पाटील राऊत
जिंतूर शहरातील पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन
उपोषणाचा दुसऱ्या दिवशी देखिल तोडगा नाही;तर जिजाऊ ब्रिगेडचा प्रशासनाला इशारा तसेच उपोषणास पाठिंबा
परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या अतिक्रमण तत्काळ हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने 14 जानेवारी पासून उपोषणास सुरुवात केलेली आहे मात्र संबंधित विभागाने दखल घेतली नसल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करून अतिक्रमण तत्काळ हटवले नाही तर आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिनांक 15 जानेवारी रोजी देण्यात आला आहे
जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळे शहराचा वैभवात भर पडली आहे मात्र मागील काही दिवसांपासून पुतळा परिसरात अतिक्रमण वाढलेली आहेत यामुळे राहदारीस तसेच घाणीचे प्रमाण वाढले आहे परिणामी पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज तमाम महिलांचे प्रेरणास्थान असून पुतळा परिसराची अशी अवस्था होत असेल तर ती कदापी खपवून घेतली जाणार नसल्याचे जिजाऊ ब्रिगेडने निवेदनात म्हटले आहे शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी मागील दोन दिवसांपासून उपोषणास बसलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची साधी दखल घेतली नसल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडचा महिलांनी आक्रमक भूमिका घेत तत्काळ अतिक्रमण हटवले नाही तर आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन नायब तहसिलदार ओमप्रकाश गोंड यांना निवेदन देऊन इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडचा तालुका अध्यक्षा रंजना भोंबे,शालिनीताई देशमुख,नमिता सोळंके,मीराबाई काळे,यशोदा लिखे,मिना भोंबे,अश्विनी मेटांगळे,प्रतिभा साबळे,संगीता दाभाडे,सविता भोंबे,अंजली कदम,आदी जिजाऊ ब्रिगेडचा महिला उपस्थित होत्या.