Home विदर्भ श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आलापली यांच्या वतीने भव्य रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट...

श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आलापली यांच्या वतीने भव्य रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन..!!  जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!!

88
0

राजेंद्र पाटील राऊत

श्रीकृष्ण क्रीडा मंडळ आलापली यांच्या वतीने भव्य रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन..!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) अहेरी तालुक्यातील आलापली येथे श्रीकृष्ण क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित भव्य रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या 30 यार्ड सर्कल सामनेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ सोनालीताई अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टायगर ग्रुपचे श्री.दौलतभाऊ रामटेके होते.तर मंचावर ग्रा.प.सदस्य सौ.छायाताई सप्पीडवार,जूलेख शेख,सुरेश संड्रा,सुनंदा भीमनपलीवार,चंद्रकिशोर पौड़ी,रामया सप्पीडवार,निलेश नामनवार होते. यावेळी प्रतिष्ठित नागरिक,व मंडळाचे अध्यक्ष श्री.मुनेश गुंडावार,उपाध्यक्ष श्री.अमोल सामीलवार,प्रकाश सिंगनेर,तिरुपती बोम्मेवार,आकाश सिंगनेर,आदि उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here