Home मुंबई कमिटी कमिटी खेळण्यात कामगारांना स्वारस्य नाही… !

कमिटी कमिटी खेळण्यात कामगारांना स्वारस्य नाही… !

166
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कमिटी कमिटी खेळण्यात कामगारांना स्वारस्य नाही… ! 🛑
✍️ मुंबई : विजय पवार ( महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा व मालमत्तांचा ताबा महाराष्ट्र सरकारने घेऊन ,एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी घोषित करावेत आणि महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतनादि सर्व सेवाशर्ती दिनांक १.१.२००६ पासून लागू करून थकबाकीचे प्रदान तातडीने करावे ,अशी मागणी संघर्ष एस.टी. कामगार युनियनने
सातत्याने केली आहे.

एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या मागणीचा पाठपुरावा सातत्याने केलेला आहे.

एस.टी. महामंडळाच्या प्रशासनाने संघर्ष एस . टी . कामगार युनियनच्या विरोधात मा. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मा .उच्च न्यायालयाने या मागण्यांबाबत समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे.सदर निर्णय एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी समाधानकारक नसून ,या निर्णयाने काहीही साध्य होणार नाही.

कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार स्वतः मा . मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन , कामगारांच्या मागणीप्रमाणे एस . टी. महामंडळाच्या महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाचा निर्णय घ्यावा ,अशी मागणी संघर्ष एस.टी. कामगार युनियन करत आहे .

या पार्श्वभूमीवर , एस .टी .महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत एस .टी .महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय

संघर्ष एस टी कामगार युनियन घेतला आहे
शशांक राव,उदय भट
ज ‌म कहार ⭕

Previous articleखेड सातारा येथे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन सातारा टिमची बैठक पार पडली 🛑
Next articleसत्ताधारी गटातील नगरसेवकाचा सभात्याग.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here