राजेंद्र पाटील राऊत
मुखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाची महिला आघाडीची बैठक संपन्न.
नांदेड (मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड येथे प्रहार जनशक्ती पक्षाची महिला आघाडीची बैठक आज घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्ष मुखेड शहराध्यक्ष अरुणाताई पोतदार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी पक्ष प्रवेश केला. या बैठकीत महिलांवर होणार्या अन्याय, अत्याचार या विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीत अरुणाताई पोतदार बोलताना म्हणाल्या की कुठेही महिला वर जर कोणी अत्याचार करत असेल तर मला कळवा मी आणि माझी संघटना घेऊन तुमच्या मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड महिला महानगराध्यक्ष विजयाताई काचावार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड युवा जिल्हा अध्यक्ष श्री शंकर भाऊ वडेवार, प्रहार जनशक्ती पक्ष मुखेड तालुका अध्यक्ष श्री शिवानंद बंडे, शहराध्यक्ष साई भाऊ बोईनवाड, युवा शहराध्यक्ष राहुल कंदमवार यावेळी उपस्थित होते.