Home मराठवाडा चिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने मोफत गॅस कनेेक्शन

चिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने मोफत गॅस कनेेक्शन

304

राजेंद्र पाटील राऊत

चिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने मोफत गॅस कनेेक्शन औरंगाबाद  (ब्युरो चिफ:बबन निकम युवा मराठा न्युज नेटवर्क)- प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत प्रत्येक बीपीएल कुटुंबातील महिलांच्या नावे एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येते, अर्जदारांना सामाजिक आर्थिक जाती गणना यादी अंतर्गत एलपीजी गॅस कनेक्शन साठी पात्र ठरविण्यात येते, सदर योजना बीपीएल कुटुंबातील महिलांसाठी असून शासनाच्या नियमानुसार चिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने सौ मंगल बाळू वाघ( सरपंच )श्री उत्तमराव निकम( उपसरपंच )यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शन चे नऊ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी आर के पाटील( माजी सरपंच), इंडियन गॅस एजन्सी चे मालक श्री जनार्धन नामदेव मगर तलवाडा, श्री केशव सूर्यवंशी( ग्रामसेवक )आनंद निकम (शालेय समिती अध्यक्ष) श्री किरण गायके (सामाजिक कार्यकर्ते) श्री पद्माकर निकम, श्री बाबासाहेब फटाकडे ,श्री नंदू घायवट ,श्री बापू भगत श्री रामदास निकम श्री नवनाथ निकम श्री दिलीप निकम ,रमेश शेलार आदींची यावेळी उपस्थिती होती.