Home नांदेड अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले

237

राजेंद्र पाटील राऊत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

गेल्या दहा दिवसापासुन नांदेड जिल्हयात सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे . आज शेतकरी राजा कोलमोडुन पडलेला आहे . श्तकरी राजाला उभा करणे व त्यांना आर्थिक मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे . मुख्यमंत्री साहेब , एखादया कर्मचाऱ्याचा एक महिन्याचा पगार न झाल्यास तो कर्मचारी किती अडचणीत असतो ? त्या कर्मचाऱ्याला एक महिना संसार कसा चालवावा याच टेंशन येत असत मग तर इथे बळीराजाचे वर्षाचे पिक होत्याचे नव्हते झाले . शेतकरी राजा एका दान्यापासुन हजारो दाने करण्याच्या उद्देशाने शेतामध्य राबत असतो पण निर्सगाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्याला आपल्या दारात यावे लागत आहे . वरील सर्व गोष्टीचा विचार करुन मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपये तेही वीस दिवसाच्या आत्ता देण्यात यावे.

अदि मागण्याचे निवेदन तहसिलदार मार्फत राज्यांचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांना पाठवण्यात आले.मागण्या मान्य न झाल्यास राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतिने यापेक्षा ही आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिले.

यावेळी राजमुद्रा सामािक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पा. इंगोले , जिल्हाध्यक्ष शहाजी पा. शिंदे , सचिन चव्हाण , बंटी गायकवाड , श्रीकांत बस्वदे , साईनाथ गोडबोले ,सलमान पठाण,आरिफ शेख , अमोल अतनुरे , बालाजी इंगोले , कपिल काटेवाड, बाळू पिटलेवाड , यौगेश जाधव,कपिल मोटरगेकर यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleसार्वजनिक बांधकाम विभाग ने घेतली कॉंग्रेस च्या निवेदनाची दखल.
Next articleतंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची बिनविरोध निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.