राजेंद्र पाटील राऊत
पुणे जिल्हयातल्या भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यात होणार अपघातग्रस्त जनतेची गैरसोय आता दूर …! भोर,(महेश भेलके प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
भोर वेल्हा मुळशी चे आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील नसरापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 लगत पशुसंवर्धन विभागाची एकूण 84 गुंठे जागा त्यापैकी 40 गुंठे जागा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ट्रामा केअर सेंटर साठी हस्तांतरित करावी अशी मागणी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचेकडे केली होती, त्याप्रमाणे 40 गुंठे जागा ही पुणे जिल्हा परिषद यांचेकडे हस्तांतरित करण्याचे काम देखील झाले आहे ,महामार्गावरील अपघातग्रसतांसाठी तातडीने उपचार व्हावेत या उद्देशाने ग्रामीण ट्रामा केअर सेन्टर व्हावे याकरिता आमदार थोपटे हे प्रयत्नशील होते त्यासाठी त्यांनी महामार्गालगतील 2/3 जागा देखील सुचवल्या होत्या त्यामध्ये चेलाडी नसरापूर येथे जागा उपलब्ध झाल्याने त्याठिकाणी अजूनही जागा उपलब्ध करून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेन्टर मंजूर होत आहे ,हे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नातून तसेच जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांच्या मागणीनुसार होत आहे,सदरचा पत्रव्यवहार आवाळे यांनी पत्रकारांशी चर्चे मार्फत मांडला यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता नसरापूर ची जागा नसरापूर आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषद पुणे यांचेकडे हस्तांतरित होत आहे मात्र ग्रामीण रुग्णालय उभारणे किंवा ट्रामा केअर सेन्टर उभारणे हे काम जिल्हा परिषदेचे नसून राज्य शासनाच्या अखत्यारीतले आहे याबाबत फक्त राज्य शासनच निर्णय घेणार असे सांगण्यात आले आणि यासाठी राज्यशासनाचे भोर वेल्हा मुळशी चे प्रथम नागरिक आमदार संग्राम थोपटे हेच प्रयत्नशील आहेत याबाबत तिळमात्र ही शंका नाही