राजेंद्र पाटील राऊत
मालेगाव तालुक्यात सट्टा मटक्याला आला बहर,पोलिसांचा दिसत नाही असर
पोलिस कारवाईत कमी झाली कसर..!
(राजेंद्र पाटील राऊत युवा मराठा न्युज)
मालेगांव,दि.१३– अनेक सर्वसामान्य गोरगरीब आयाबहिणीचे संसाराची राखरांगोळी करणाऱ्या सट्टा मटका धंद्यातील माहिरांनी आपला धंदा तेजीत चालावा म्हणून मालेगांव तालुक्याच्या विविध भागात सट्टा मटका धंद्याला अक्षरशः बहर आणला असून,त्यामुळे मात्र सर्वसामान्य महिलांच्या संसारात माती कालवण्याचे महापाप या सट्टाकिंग असलेल्या माफीयाकडून सर्रासपणे घडत असूनही पोलिस प्रशासनाचे मात्र अर्थपुर्ण दुर्लक्ष झाले किंवा काय?असा सवाल आता उपस्थित होत आहे.
वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भायगावच्या इंदीरानगर परिसरात गँस गोडावून असलेल्या भागात सट्टा मटक्यासह अवैध धंद्याना ऊत आला आहे.त्यामुळे स्थानिक जनता त्रस्त झाली आहे,सटाणा येथील तत्कालीन कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून छाप पाडलेले देवेंन्द्र शिंदे यांनी नुकताच वडनेर खाकुर्डी पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारलेला असून त्यांचेकडून या अवैध धंद्याविरोधात धडाकेबाज कारवाईची अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.त्याशिवाय मालेगांव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नगाव (दिगर) व सौंदाणे नांदगाव येथेही सट्टा किंगाचा उच्छाद मोठया प्रमाणावर वाढलेला असून,परिणामी तरुण पिढी वाममार्गाला लागून बरबाद होत चालल्याचे विदारक चित्र उभे ठाकले आहे.तर छावणी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दाभाडी गावातही खुलेआम सट्टा मटका जोमात सुरु असून,राजकीयदृष्टया सक्षम व नावलौकिक प्राप्त गावातही असे अवैध धंदे सुरु असल्यामुळे पोलिस प्रशासन नेमके कर्तव्यात कुठे कसर करत आहे असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.