Home मराठवाडा हंडी फाटा ते नलडोह रस्त्याची दुरावस्था ३० वर्षापूर्वी केला होता रस्ता परिसरातील...

हंडी फाटा ते नलडोह रस्त्याची दुरावस्था ३० वर्षापूर्वी केला होता रस्ता परिसरातील नागरिकांची दुरुस्तीची मागणी

405
0

राजेंद्र पाटील राऊत

हंडी फाटा ते नलडोह रस्त्याची दुरावस्था
३० वर्षापूर्वी केला होता रस्ता
परिसरातील नागरिकांची दुरुस्तीची मागणी
जिंतूर,(विष्णू डाकोरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
कोरवाडी.
जिंतूर तालुक्यातील हंडी फाटा ते मंठा तालुक्यातील किरतापुर मार्गे नलडोह या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. 30 वर्षापूर्वी तयार केलेला रस्ता खराब झाला असून सदरील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. जिंतूर तालुक्यातील हंडी हे मंठा तालुक्याच्या सीमारेषेवरील गाव आहे. हंडी ते जिंतूर रोडवर हंडीपासून 3 की.मी. अंतरावर मंठा तालुक्यातील कीर्तापूर मार्गे नलडोह जोडणारा रस्ता म्हणजे हंडी फाटा होय.
हा रस्ता परभणी आणि जालना या दोन जिल्ह्याला जोडणार जवळचा रस्ता असून त्या मार्गे वाहनाची सतत वर्दळ असते. परंतु सध्या या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने नागरिक वैतागले आहेत. परतूर चे माजी मंत्री रामप्रसाद बोराडे यांच्या कार्यकाळात नलडोह ते हंडी फाटा या रस्त्याचे काम झाले होते. दरम्यान मधल्या काळात जिंतूर ते सेलू हा मंठा मार्ग धावणारी बस या रोड ने जात असे. 7 ते 8 वर्षापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र आता त्याची दुरावस्था झाली आहे.
शिवाय या रस्त्यावरून परिसरातील कवडा, कोरवाडी, सायखेडा, असोला, वझर, कीर्तापूर तांडा या गावातील वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता या दोन्ही तालुक्यांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे.
सदरीत रस्त्याचा प्रश्‍न तातडीने सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here