राजेंद्र पाटील राऊत
वीज वितरण कंपनीचे शहरात असलेले खांब डीपी यांना फाळा आकारणी यावी. = उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण.
पेठ वडगाव:(राहूल शिंदे ) पेठ वडगाव येथील वीज वितरण कंपनीचे शहरात असलेले खांब व डीपी यांना फाळा आकारणी करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील मटन चिकन व मासे विक्री करणारी दुकाने काढावेत यासाठी प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही कारवाई झाली नाही आठ दिवसात दुकान अन्यत्र हलविण्यात यावे नाहीतर पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल असा सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक कालिदास धनवडे यांनी सर्वसाधारण सभेत इशारा दिला. तसेच मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांना प्रशासन दुर्लक्षित करून अन्याय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगरपालिकेने साडेआठ लाख रुपयात घेतलेल्या फायर बुलेटच्या खरेदीची माहिती नगरसेवक संदीप पाटील व अजित थोरात यांनी विचारली यावेळी मुख्याधिकारी यांनी सदर गाडी शासनाच्या जेम्स पोर्टल वरून घेतली आहे. संबंधित कंपनीने बिल तपशील दिल्याशिवाय बिला अदा केले जाणार नाही असा खुलासा केला. धान्य लाईन मध्ये भाजीपाला विक्रेते दोन्ही साईडला बसताना दिसतात त्यामुळे एखाद्या वेळेस भांडणाचे प्रकार घडतात व ट्रॅफिकला अडचण निर्माण होते. भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी संतोष गाताडे यांनी केली.