Home Breaking News रानसुगावच्या नम्रता जाधव या शेतकरी कन्येची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी पदी...

रानसुगावच्या नम्रता जाधव या शेतकरी कन्येची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी पदी निवड.

164
0

रानसुगावच्या नम्रता जाधव या शेतकरी कन्येची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी पदी निवड.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कु. नम्रता जाधवचा नायगांव माणिक नगर येथे वैष्णव कुंज निवास स्थानी पञकार बाळासाहेब पांडे व परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन संभाजी पाटील जाधव, वडील आनंदा पाटील जाधव आदि उपस्थित होते.
जिद्द चिकाटी व मेहनत यांचा त्रिवेणी संगम करीत ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील रानसुगाव ता.नायगाव खै.जि.नांदेड येथील आनंदराव तुळशीराम जाधव यांची कन्या कु.नम्रता उर्फ दीपाली आनंद जाधव हिची भारतीय वायू सेनेत (फ्लाईंग ऑफिसर) उड्डाण अधिकारी या पदासाठी निवड झाली असून तिने यश संपादन केलेल्या यशा बद्दल तिचे रानसुगाव व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
कु नम्रता उर्फ दीपाली आनंद जाधव हीचा जन्म रानसुगाव ता नायगाव खै.जि.नांदेड या छोट्याश्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. वडील देशसेवेत सैनिक असल्याने वडिलांन सोबत असणारे अधिकारी यांची छायाचित्रे पाहून इयता चौथी पासूनच नम्रताला अधिकारी होण्याची आवड निर्माण झाली.
नम्रताचा “फ्लाइंग ऑफिसर” उड्डाण अधिकारी होण्याचा मानस सुरुवाती पासूनच होता परंतु तिच्या जीवनात अनेक संकट आली. त्या संकटांचा सामना करीत नम्रता उर्फ दीपालीने वायू सेनेत उड्डाण अधिकारी या पदावर अखेर नियुक्ती मिळवलीच त्याबद्दल तीचे आई बाबा, काका-काकू व गावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुळी कन्या पुत्र, होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे जिवा या संत वचना प्रमाणे सौ रुक्मिणी बाई व आनंदराव जाधव या आई वडिलांना आपली कन्या भारतीय वायू सेनेत अधिकारी झाल्याचे पाहून खूप आनंद झाला आहे.तिचे काका माजी चेअरमन संभाजी पाटील जाधव यांना ही हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.आनंदराव हे सात भावाच्या कुटुंबातील व्यक्तिमत्व असुन, त्यांनि जिद्दीने शिक्षण घेऊन भारतीय सैन्यात नोकरी स्वीकारली व आपली तीन कन्या व एक पुत्ररत्न याना शिक्षणा साठी पुणेगाठले. यातील तिसऱ्या क्रमांकाची कन्यारत्न नम्रता ही सन 1996 मध्ये शेतकरी कुटुंबात जाधव परिवारात जन्माला आली. तिचे वडील थल सेनेतून सेवा निवृत झाले आसून तिला आई ,दोन बहिनी व एक भाऊ असे घरातील सदस्य आहेत.तिचे लहानप्‌नापासूनचे आर्मी नेव्ही किंवा एअर फोर्स मध्ये जान्याची व देश सेवा करण्याची तिची इच्छा होती. पाचवीला असतानाच ‘सी कैडीट कोर’ या आर्थाय जल सैनिकाची ट्रेनिंग तिने घेतली. इंजिनिअरिंग चालू असतानाच एन.सी.सी. मध्ये भाग घेतला व अनेक पदकं मिळवले. तिला नृत्य कला ही अवगत आहे. तसेच तिची कामगिरी फार मोठी होती की त्यांनी एन.सी.सी. मध्ये असताना २६ जानेवारी २०१७ मध्ये गणतंत्र दिवसाच्या दिवशी दिल्लीत राजपथवर संचलन पदाचे सूत्रं हाती घेतले होते. तसेच कझाकीस्थान येथे गेलेल्या संपूर्ण भारतीय तुकडीचे नेत्रत्व ही केले.
नम्रता हीने अतिशय मेहनतीने अभ्यास केला व इंजिनीअरिंग मध्ये उच्च प्रथम श्रेणी ने उत्तीर्ण झाली. त्याच बरोबर तिने Counter terrorism studies मध्ये डिप्लोमा व MBA (management studies) करत असताना सैन्यात आधिकारी होण्याची तयारी सुरू ठेवली.शेवटी तिच्या अथक परिश्रमाला यश मिळाले असून तिची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी
म्हणून नियुक्ती झाली. अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Previous articleकोविड काळातील विधवांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Next articleकावड पालखी: मानाच्या एका पालखीसह 25 शिवभक्तांना परवानगी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here