राजेंद्र पाटील राऊत
देवळाण्यात कांदा पिकांचे लाखो
रुपयांचे अज्ञाताकडून नुकसान
सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– आधीच शेतकरी वर्ग विविध संकटाना तोंड देऊन पुरता मेटाकुटीस आलेला आहे,त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाने उघडीप दिल्याने आणि त्यातच कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी वर्ग हतबल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
आधीच त्रस्त झालेला शेतकरी वर्ग आता वेगळ्याच संकटाने हादरला आहे.सटाणा तालुक्यातल्या देवळाणे येथील शेतकरी आनिल पंडीत पवार यांच्या शेतात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या कांदा चाळीत कुणी तरी अज्ञात संशयिताने युरिया सदृश्य रसायन कांदा चाळीवर फेकल्याने पवार यांच्या लाखो रुपयांच्या विक्रीसाठी तयार असलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले असून,गुन्हेगाराचा शोध घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
याप्रकरणी आनिल पंडीत पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जायखेडा पोलिस स्टेशनला अज्ञात संशयित गुन्हेगाराविरुध्द भा.दं.वि.कलम ४२७ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली असुन, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.