Home विदर्भ अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

196
0

राजेंद्र पाटील राऊत

अकोला: (सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अकोला शहरातल्या   वेगवेगळ्या  भागातून दुचकि चोरणाऱ्या टोळीचा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या विशेष पथकाने कारवाही केली. पथकाने सहा आरोपी अटक करून एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या मागावर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांचे विशेष पथक होते. यामध्ये जुने शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हात मिळालेल्या माहितीवरून पथकाने 6 आरोपीला अटक केली.

फरजिन शेख नदीम अहमद रा.हमजाप्लॉट, उमेर खॉन अजीज खॉन रा.हमजा प्लॉट, शेख सोहब शेख जमीर रा.हमजा प्लॉट, शेख रिहान शेख रशिद रा . नवाबपुरा, शेख मोहीत शेख अजीज रा.मुस्लीम कॉलनी भुसावळ, विधी संघर्ष बालक असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीच्या ताब्यातून दोन मोटार सायकलचे 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या विशेष पथकाचे पोहेकॉ महेन्द्र बहादुरकर, जाकीर खॉन, नापोकॉ.शेख हसन, मोहम्मद नदीम, पोकॉ संतोष गांवडे राज चंदेल, श्रीकांत पातोंड यांनी केली.

Previous articleपावसाळ्यात साथरोग उद्भभवणार नाहीत म्हणून उपाययोजना करण्याचे पालकमंत्र्याचे सुतोवाच
Next articleदेवळाण्यात कांदा पिकांचे लाखो रुपयांचे अज्ञाताकडून नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here