Home कोल्हापूर कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव

कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव

205

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर( अविनाश शेलार याज कडून ): महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण करूनच, शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली आहे.
आमदार जाधव यांनी आज मुंबईत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाल्याने, येत्या १७ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केलेली आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाला असला तरी, तिसऱ्या लाटेचे संकेत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे आरोग्य विभागाला सांगीतले आहे. यांमुळे तिसरी लाट थोपवण्याबरोबर लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबवावी. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील सर्व शाळा सुरू कराव्यात.

Previous articleपेठ वडगांव येथील सुयश लॅब वर आरोग्य अधिकाऱ्याची धाड –
Next articleस्वाभिमानीच्या लढ्याला एक वर्षानंतर यश. जळगाव संग्रामपूर शेगाव तालुक्याला मिळणार ६४ कोटी ७ लक्ष.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.