Home कोल्हापूर पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर आरोग्य अधिकाऱ्याची धाड –

पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर आरोग्य अधिकाऱ्याची धाड –

781
0

राजेंद्र पाटील राऊत

पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर आरोग्य अधिकाऱ्याची धाड –                                          कोल्हापूर (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क )-पेठ वडगांव येथील हातकणंगले रोडवर असणारे सुयश लॅब च्या माध्यमातून रूग्णांना शुगर चे चुकीचे रिपोर्ट देत असलेचे व त्यामुळे रुग्णावर उपचार ही चुकीच्या पद्धतीने होत असलेचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस तय्यब कुरेशी यांनी नुकतेच उघडकीस आणत सुयश लॅब चा भोंगळ कारभार उघड केला व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांना पुरावे देऊन निवेदनाद्वारे सुयश लॅब वर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.तसेच वडगांव शहरात चुकीचे रिपोर्ट देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमद्दे जोर धरू लागली होती
त्यानुसार आज आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ उत्तम मदने यांनी याची तात्काळ गंभीर दखल घेत पेठ वडगांव येथील सुयश लॅब वर अचानक धाड टाकत लॅब ची तपासणी करत सर्व रिपोर्टची तपासणी केली व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करत प्रश्नांचा भडीमार केला .यावेळी डॉ उत्तम मदने यांनी लॅबची सखोल चौकशी करून दोषी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले .
यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तय्यब कुरेशी ,राजू वायदंडे,जावेद सय्यद, प्रसाद रावळ राहील पटवेगार व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleभाजपा, अनूसूचित आघाडीवर ज्ञानदेव भारसाकडे, पांडुरंग इंगळे.
Next articleकोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here