Home Breaking News इंडोसन फायनस कंपनीच्या मैनेजर दसपुतेची गुंडा गर्दी रात्री 11:20 च्या नंतर केला...

इंडोसन फायनस कंपनीच्या मैनेजर दसपुतेची गुंडा गर्दी रात्री 11:20 च्या नंतर केला घरावर हमला           औरंगाबाद येथील भयानक घटना….फायनान्स कंपन्यांच्या पाळीव गुंडाची दंडेलशाही…!!

354
0

इंडोसन फायनस कंपनीच्या मैनेजर दसपुतेची गुंडा गर्दी रात्री 11:20 च्या नंतर केला घरावर हमला           औरंगाबाद येथील भयानक घटना….फायनान्स कंपन्यांच्या पाळीव गुंडाची दंडेलशाही…!!

औरंगाबाद    ( प्रशांत बच्छाव प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वाहन मालक संदिप पवार बाळापुर औरंगाबाद यांनी आपल्या वयक्तीक घरगुती आडचणी मुळे त्यांची MH 20 EG 6908 हि गाड़ी कायम स्वरूपी विक्री केली होती.आलेल्या पैशा मधुन संदिप पवार यांनी इंडोसन बैंकेचे सर्व कर्ज भरले.परंतु बैंक मैनेजर दसपुते NOC देण्यास सतत चाल ढकल करत होते.परंतु ती गाड़ी खरेदीदार यांनी संदिप पवार यांचेकडे NOC किंवा आगाऊ घेतलेले 3 लाख रूपये मला परत करण्यात यावेत यासाठी तगादा लावलेला होता.
दि.26 जुलै 2021 रोजी शेवटी कंटाळुन संदिप पवार यांनी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या भाऊसाहेब येळवे यांना भेटून वरील प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. सदरची माहिती येळवे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर साहेबांना दिली व संदिप पवार आणि इंडोसन बैंकेचे मैनेजर दसपुते यांच्यातील दोन मोबाइल काँलच्या रेकाँर्डिंग श्री संजय हाळनोर यांच्या मोबाइलवर फारवर्ड केल्या.
त्या नंतर दि.7/8/2021 रोजी संदिप पवार बाळापुर यांनी औरंगाबाद येथील संस्थेच्या कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्यावर इंडोसन कंपनी कडून होणार्या त्रासा बद्दलची माहिती दिली.श्री संजय हाळनोर यांनी मैनेजर दसपुते यांना फोन करूण NOC च्या दिरंगाई बाबत विचारणा केली आसता. मस्तवाल मैनेजरने उद्दाम पणाची भाषा वापरून फोन कट करूण टाकला.
जेव्हा मैनेजर दसपुतेला समजले की सोमवार दि.9/8/2021 रोजी श्री संजय हाळनोर सदरच्या प्रकरणी पोलीस कमीश्नर कार्यालय औरंगाबाद येथे रितसर तक्रार करणार आहेत.त्या अनुषंघाने मस्तवाल इंडोसन बैंकेच्या मैनेजर दसपुते यांनी मंदधुद बेकायदा 5 गुंड प्रवृतीच्या लोकांना सोबत घेऊन श्री संजय हाळनोर यांच्या राहत्या घरी जाऊन रात्री 11:20 नंतर श्री संजय हाळनोर वय वर्ष 51 ,श्री ज्ञानेश्वर हाळनोर वय वर्ष 29 ,अजय हाळनोर वय वर्ष 21 तसेच श्री संजय हाळनोर यांच्या पत्नी वय वर्ष 46 व ज्ञानेश्वर हाळनोर यांच्या पत्नीसह सर्वांना मारहाण केली.

चौकट

श्री ज्ञानेश्वर हाळनोर यांच्या पत्नी ह्या तीन महिन्याच्या गर्भवती आसून त्यांना पण ओट्या वरुण खाली खेचून त्यांना पण चापट बुक्यांनी तसेच लाकडी दांड्याने ओटी पोटावर मारहाण करूण विनय भंग करण्यात आला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन पोत हिसकावून नेण्यात आल्या.त्यांचेवर घाटी रूग्णालयात उपचार चालू आहेत व इतर जखमीवर प्राथमिक उपचार करूण दि.8/7/2021 रोजी पहाटे 4 वा.घरी सोडण्यात आले 

Previous articleशेळगाव गौरी ता. नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक किशनराव जकोजी पा.घाटोळे यांचे अल्पशा आजाराने निधन.
Next articleवनपट टिंगरीचा तलाठी अनंता वायाळ, सात हजाराची लाच घेताना झाला एसीबीकडून घायाळ!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here