Home नांदेड शेळगाव गौरी ता. नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक किशनराव जकोजी पा.घाटोळे यांचे अल्पशा...

शेळगाव गौरी ता. नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक किशनराव जकोजी पा.घाटोळे यांचे अल्पशा आजाराने निधन.

356
0

राजेंद्र पाटील राऊत

शेळगाव गौरी ता. नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक किशनराव जकोजी पा.घाटोळे यांचे अल्पशा आजाराने निधन.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार. युवा मराठा न्यूज नेटवर्क
आज दिनांक 8ऑगस्ट 2021 रोजी शेळगाव गौरी ता. नायगाव येथील प्रतिष्ठित नागरिक किशनराव जकोजी पाटील घाटोळे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शेळगाव गौरी येथील माधवराव पाटील शेळगावकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. शेती व जोडव्यवसायात ते अभ्यासू म्हणून गावात सर्वश्रूत होते. समाजकारण, राजकारण हे त्यांच्या आवडीचा विषय होता. युवा मराठा न्यूजचे नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव पाटील घाटोळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी ठीक 4 वाजता अंत्यसंस्कार शेळगाव गौरी येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू , नाती असा मोठा परिवार आहे.युवा मराठा न्युज महाराष्ट्र परिवार घाटोळे पाटील कुटूंबियांच्या दुःख प्रसंगात सहभागी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here