नांदेड जिल्ह्यात भर पावसात दिव्यांगानी ग्रामपंचायत बावलगाव ता. मुखेड येथे दिव्यांगानी थालीनांद आंदोलन करून घोषणेने प्रशासन जागा करण्याचा केला प्रयत्न.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय समोर झोपेत असलेल्या शासन प्रशासनास जागे करण्यासाठी . २८ जुन २०२१ ते 30 जुलै २१ पर्यंत नादेड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय समोर थालीनांद आंदोलन संघटनेच्या वतीने चालु असुन सोळाव्या दिवशी भर पावसाची पर्वा न करता बावलगाव ता. मुखेड येथे दिव्यांगानी शासन प्रशासनास जागे करण्यासाठी प्रयत्न केला आता तरी येथे झोपलेल्या प्रशासनास जाग येईल काय?
दिव्यांगाची व्यथा जर सनदशीर मार्गाने प्रशासनास कळत नसतील तर ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप लावण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आली.
या आंदोलनात निवेदन स्वीकारण्यासाठी सरपंच यांनी निवेदन स्वीकारून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वसन दिले.
खालील मागण्या संदर्भात दिव्यांगानी आपला संताप घोषणेने व्यक्त केला.
खालील मागण्यास त्वरीत न्याय द्यावा –
दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभा घेऊन योजनेची माहिती देऊन अंमलबजावणी करावी दिव्यांग अँप मध्ये नोंदणी पासुन एकही दिव्यांग वंचित राहू नये म्हणून मा जिल्हाधिकारी साहेब यांनी तिन वेळा वेळापञक देऊन अकरा महिन्यात दिव्यांगाना माहिती न देता आपल्या आदेशाची अंमल बजावणी न करणार्यादिव्यांगाना निधी व हक्कापासुन वंचित ठेवणार्या दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. पंचायत समीती अंतर्गत दिव्यांगाचा पाच टक्के निधी अनुशेष सहित वाटप न करणार्या गटविकास अधिकारी यांच्या वर कार्यवाही करावी. ग्रामपंचायतचा दिव्यांग राखीव पाच टक्के स्वनिधी, तेरावा, चौदावा, पंधरावा विकासातून 2016 ते आज पर्यंत राखीव दिव्यांग निधी न देणार्या दोषी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्वरीत वाटप देण्यात यावा.
दिव्यांगाना घरकुल योजनेतून प्राधान्य क्रमाने घरकुल गावातील रिकाम्या जागेत त्वरीत देण्यात यावा. दिव्यांगाना स्वयंरोजगार करण्यासाठी गाळे किंवा 200 फुट जागा त्वरीत देण्यात यावा
दिव्यांग कायदा 2016 कलम 92 ए,बी.सी प्रमाणे दिव्यांगाना ञास देणार्या दोषींवर कारवाई करावी.
वरील मागण्या एका महिन्यात पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप लगाओ आंदोलन करण्याचा इशारा दिला.
थालीनाद आंदोलनात यशस्वी करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र बावलगाव बालाजी गवसले, हनमंत ताटे, रंजना ईबितदार, हनमत कदम, शाहेयाबी शेख, रहेमतूला शेख, धोडीबा गवाले, राम वडले आदी कार्यकर्त्यांनी थालीनांद आंदोलन यशस्वी केले.