Home सांस्कृतिक 🛑 ”मराठा सिर्फ दो ही बात जानता है मारना या मरना ”...

🛑 ”मराठा सिर्फ दो ही बात जानता है मारना या मरना ” ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज 🛑

204
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 ”मराठा सिर्फ दो ही बात जानता है मारना या मरना ” ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज 🛑
✍️ मनोरंजन 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये अनेक देशभक्तीने ओथंबलेले संवाद पाहायला मिळतात. *हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल*
देशभक्तीच्या भावनेने भरलेला अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भुज द प्राइज ऑफ इंडिया’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सत्य कथेवर आधारित या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार या ट्रेलरमध्ये दिसतो. सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे.

या चित्रपटात विजय कर्णिकच्या भूमिकेत अजय देवगण दिसला आहे. तर नोरा फतेहीही या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. गुजराती वेशभूषेत सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा लूकही प्रभावशाली वाटत आहे. शरद केळकरही एका साहसी सैनिकाचे पात्र साकारत आहे.

*डायलॉग्स*

ट्रेलरमध्ये अनेक देशभक्तीने ओथंबलेले संवाद पाहायला मिळतात. यातील लक्ष वेधणारे काही डायॉग्ज पुढील प्रमाणे –

*”मराठा सिर्फ दो ही बात जानता है…मारना या मरना”*

”किसी की जान बचाने के लिए की गई हिंसा धर्म है, ताजमहल प्यार की निशानी है तो हिंदुस्तान तेरे बाप की कहानी है”

*”या खुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरे हिंदुस्तान को सलामत रखना”.*

*काय आहे चित्रपटाची कथा?*

‘उरी’ चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे ‘भूज द प्राईड ऑफ इंडिया’. अभिषेक दुधाइया ‘भूज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी भुज विमानतळाचा प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्याभोवती फिरत आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत भुजच्या निर्मात्यांनी सांगितले होते की हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी डिस्ने-हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. अजय देवगणशिवाय संजय दत्त, सोनाक्षी, नोरा आणि अ‍ॅमी यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्याशिवाय शरद केळकर, प्रणीता सुभाष, इहाना ढिल्लनसुद्धा स्क्रीन शेअर करताना दिसतील.⭕

Previous articleस्टेजवरच सर्वांसमोर अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका 🛑
Next articleशंभूराजे ग्रुप ऑफ बिजनेस तर्फे वाघोली येथे सुरू करण्यात आलेल्या “खादी इंडिया” कपड्यांच्या शोरूमचा शुभारंभ आज संपन्न झाला 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here