Home कोल्हापूर शिवस्वराज्य दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रम

शिवस्वराज्य दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रम

224

राजेंद्र पाटील राऊत

शिवस्वराज्य दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेत कार्यक्रम

कोल्हापूर 🙁 मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून, यंदाच्या वर्षापासून “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज रविवार दि. 6 जून रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी 9 वा. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ‘ शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत व पंचायत समितीच्या प्रांगणात देखील ‘ शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारली जाणार आहे. यावेळी शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, पोवाडा तसेच शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या चित्रकर्त्या डॉ. अल्पना चौगुले यांचा सत्कार तसेच कोविड योध्दा कै. सुरेश निंबा देशमुख, परिचर यांच्या वारसांना शासनाने मंजूर केलेल्या 50 लाख रुपयांचा धनादेश वितरण करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजयसिंह चव्हाण, उपाध्यक्ष सतिश पाटील, (सभापती बांधकाम व आरोग्य समिती) हंबीरराव पाटील, (सभापती शिक्षण व अर्थ समिती) प्रवीण यादव, (सभापती महिला व बालकल्याण समिती) डॉ पद्यमाराणी पाटील, (सभापती समाजकल्याण समिती) श्रीमती स्वाती सासणे यांच्यासह जि.प. सदस्य तसेच, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा देसाई आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील संबंधित ग्राम पंचायती, पंचायत समित्यामध्ये लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. संपूर्ण कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करुन होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली.

Previous articleसटाणा तालुक्यात बिबटयांच्या हल्ल्यात एक ठार शेतकरी वर्गात भितीचे वातावरण
Next articleवाखारी येथे जागतीक विश्व पर्यावरण दिनानिमित भारतीय मानवाधिकार परीषदेतर्फे वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.