Home माझं गाव माझं गा-हाणं कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे,...

कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते  कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप केले.

371
0

राजेंद्र पाटील राऊत

कृषिरत्न फाउंडेशनने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनाथ कुटुंबांना तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे, खते  कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते वाटप केले.
प्रतिनिधी सतिश घेवरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
कृषिरत्न फाउंडेशन यांनी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील आत्महत्याग्रस्त शेतकरी, आकस्मित मृत्यू झालेले शेतकरी कुटुंब, अपंग व निराधार अशा 101 शेतकरी कुटुंबांना मका व बाजरी बियाणे, युरिया व साडीचोळी वाटप करण्याचा निर्धार केला आहे.
कोरोणाच्या कारणास्तव यावर्षी भव्यदिव्य कार्यक्रम साजरा न करता प्रतिनिधिक स्वरुपात 5 लाभार्थ्यांना मका बाजरी बियाणे, युरिया व साडीचोळी वाटप केले. यानंतर उरलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन बी बियाणे, खते व साडीचोळी वाटप करून कोरोणा बाबत समाजामध्ये जनजागृती करतो आहोत.
कोरोना बाबत सर्व खबरदारी घेऊन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय कृषिमंत्री श्री दादासाहेब भुसे यांनी कृषिरत्न फाऊंडेशनचे अभिनंदन केले व असेच सातत्य ठेवून कार्य सुरू राहावे या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

यावेळी भुसे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील कृषिरत्न फाउंडेशनने बियाणे खते वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला असून कोरोणाच्या नियमा प्रमाणे हा कार्यक्रम संपन करावा लागतो आहे.

गेल्या अनेक वर्षापासून कृषीरत्न फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांची सेवा सुरू आहे. बऱ्याच संस्था अशा आहेत की त्या फक्त कागदोपत्री नावाने चालू आहेत. कृतीत काहीही करत नाही. मात्र कृषिरत्न फाउंडेशन ही अशी संस्था आहे की, बोलण्यापेक्षा कृतीतून अनेक कार्यक्रम करत असतात अशा संस्थांना आपण पाठबळ देणे आवश्यक आहे कारण या संस्था शेतकऱ्यांसाठी काम करतात.

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रव्यापी येणाऱ्या खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व प्रकारचे बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे व त्या पद्धतीने नियोजन केले आहे.

बाजारामध्ये ज्या मालाला मागणी आहे. त्याचेच उत्पादन करून शेतकऱ्यांनी थेट ग्राहकापर्यंत विक्री व्यवस्था केली पाहिजे यासाठी कृषीरत्न फाऊंडेशनने मागील वर्षी चांगले कार्य केले होते.
शेतकऱ्यांनी थेट ग्राहकापर्यंत विक्री केली पाहिजे यासाठी शेतकऱ्यांचा समूह पुढे आला पाहिजे बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेअंतर्गत गट शेती, फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभा करू शकतो यासाठी कृषी विभाग पाठबळ देण्याचे काम करत आहे.

येणाऱ्या काळात देशात महाराष्ट्र पहिले राज्य असेल की येथे विशेष प्राधान्य देऊन महिलां शेतकऱ्यांना 20 टक्के योजना राखीव ठेवण्यात येणार आहेत.

तरुणांनी आता पुढे येऊन उद्योग-धंद्यात उतरले पाहिजे.

कृषीरत्न फाऊंडेशनला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

माननीय कृषिमंत्री दादासाहेब भुसे, विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे साहेब, तालुका कृषी अधिकारी मालेगाव, बाळासाहेब व्यवहारे साहेब, तालुका कृषी अधिकारी सटाणा सुधाकर पवार साहेब, सुनील माऊली देवरे, कृषिरत्न फाऊंडेशनचे मार्गदर्शक व आधारस्तंभ मा. श्री. संजय अण्णा हिरे, श्री. नवल नाना मोरे, श्री शरद भालेराव सर, कृषिरत्न फाऊंडेशनचे संस्थापक श्री योगेश दादा पवार,
यांच्या हस्ते बी-बियाणे, खते व साडीचोळी वाटप करण्यात आले.
यावेळी कृषिरत्न फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.संजय पवार उपाध्यक्ष श्री.जगदीश गांगुर्डे, संघटक श्री दत्तू पवार, बादल राजपूत, मनु काका देशमुख, शरद हिरे, प्रवीण हिरे, दिनकर आहिरे, दर्शन पवार, ललित पवार, निलेश जाधव, सचिन अहिरे, ज्ञानेश्वर शिरोळे, ज्ञानेश्वर बच्छाव, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here