राजेंद्र पाटील राऊत
दै. बालेकिल्लाचे संपादक निवृत्ती बागूल यांचे चिरंजीव विवेक यांचा साध्या पद्धतीचा विवाह समारंभ समाजासाठी आदर्शवत
मालेगांव,(श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगाव येथील दैनिक बालेकिल्लाचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री निवृत्ती एकनाथ बागुल( नानासाहेब) व सौ.सुनंदा बागूल यांचे चिरंजीव विवेक व श्री दिगंबर भटू सोनवणे यांची सुकन्या रूपाली यांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने फक्त घरच्या तसेच मोजकेच नातेवाईकाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला .विवाह सोहळा थाटामाटात न करता साध्या पद्धतीने संपन्न करून समाजासमोर एक आदर्श बागुल परिवाराने निर्माण केला आहे.
कोरोना काळातील एक अतिशय सुंदर, सर्वांनी बोध घ्यावा असा आदर्श विवाह संपन्न झाला. विवाह सोहळा कोरोना पार्श्वभूमीमुळे फक्त दोनच कुटूंबाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.कोरोना पार्श्वभूमी असतांना आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
विवाह सोहळ्या निमित्ताने कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी मांडवा प्रसंगी उपस्थित राहून विवाहासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे समाजश्री डॉ. प्रशांत दादासाहेब हिरे, माजी आमदार डाॅ.अपूर्वभाऊ हिरे ,युवानेते डाॅ.अद्वय आबासाहेब हिरे यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले . त्याचप्रमाणे उपमहापौर निलेश आहेर, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील वडगे, ज्येष्ठ नेते शांताराम लाठर ,राजेश धनवट अश्या मोजक्याच राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक , पत्रकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष तसेच सोशल माध्यमाद्वारे शुभमंगल सोहळ्यासाठी वधुवरांना शुभ आशीर्वाद दिले आहेत.