राजेंद्र पाटील राऊत
छावा संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली मा.खा.धनंजय महाडीकांची भेट
पेठ वडगांव : (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज कोल्हापूर)- राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णाच्या वाढत्या लोकसंख्या बाबत व उपाययोजना करण्यात यावेत याकरिता पश्चिम महाराष्ट्र छावा युवा संघटना अधक्ष्य शिवश्री रामदास शिवाजी गांजवे यांनी मा.खा.धनंजय (मुन्ना) महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सामाजिक कार्याबद्दल व कोरोना संसर्गा बद्दल चर्चा झाली. तसेच सीपिआर रूग्णालय कोल्हापूर आणि आयजीएम रूग्णालय इचलकरंजी या दोन्ही शासकीय रूग्णालयात पुढच्या काळात नवीन सूख सुविधा ऍडव्हान्स टेक्नाँलाजी मशीन,ऑक्सिजन प्लांट यांची कशी उपलब्धता होईल त्या संदर्भांत चर्चा करण्यात आली.
तसेच महाडिक यांनी धनंजय महाडीक युवाशक्ति फौंडेशन च्यामाध्यमातून कोल्हापूर शहरात 120 बेड चे कोविड सेन्टर लवकरच चालू करणार होते त्याबद्दलही यावेळी चर्चा करणेत आली.