Home कोकण रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑

272

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:-⭕ रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक,शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे.

या काळात कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधाचे पालन करुन मानवहिताच्या भावनेतून, श्री. छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचा ७ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे रक्तदान शिबीर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सेवाभावी संस्थेकडून कडून दि १४ मे २०२१ रोजी आयोजित केले आहे. तरी इच्छुकांनी खालील नंबर वर संपर्क करावा असे आव्हान संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांनी केले आहे.

भ्रमणध्वनी क्रमांक –
श्री. समीर अनंत धावडे (संघटक रत्नागिरी जिल्हा) – ९१३००८५४४१.
श्री. समीर श्रीपत गोताड (सचिव रत्नागिरी जिल्हा) – ९२८४१६७९३०. ⭕