Home Breaking News राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार

154
0

राजेंद्र पाटील राऊत

राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार

राजेश एन भांगे /युवा मराठा न्युज नेटवर्क

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून या लाटेचा परिणाम लहान मुलांवरही होऊ शकेल असा अंदाजा अनेक डाॅक्टरांनी दर्शवला आहे.

याच अनुषंगाने येरवडा भागातील राजीव गांधी हॉस्पिटल मध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल बनविले जात आहे.
राज्यातील हे पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल असणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये एकूण २०० बेडची सुविधा असणार आहे.
त्यामध्ये ऑक्सीजन बेड की संख्या १५० तर आयसीयू बेड की संख्या ५० असणार आहे.

आमदार सुनील टिगरे यांनी आमदार फंडातून एक कोटी रुपयांचा फंड दिला असून सोबतच सीएसआर अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध करून दिला आहे.
तर शुक्रवारी दिनांक ७ मे रोजी अतिरिक्त मनपा आयुक्त रूबल अग्रवाल यांनी भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली आहे.

यावेळी आवश्यक सुविधांची माहिती घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Previous articleमराठा आरक्षण विरोधात भारतीय मराठा महासंघाची निदर्शने
Next articleकोरोना मुळे माठ व्यवसाय संकटात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here