Home नांदेड मुखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..

मुखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..

100
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कोरोनामुळे राज्यभरात आरोग्य यंत्रणेवर भलामोठा ताण पडलेला आहे. राज्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अतिशय कमी आहे. म्हणून इतर रुग्णांची रक्ताअभावी होणारी हेळसांड थांबावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटीलसाहेब यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष मा.महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष मा.सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष मा.रवीकांत वर्पे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नांदेड(ग्रामीण)जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर साहेब,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस नांदेडचे जिल्हाध्यक्ष दिलीपदादा धोंडगे,व प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत दादा सुगावे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व् कार्यकर्ते यांना ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करुण रक्तदान करण्याचे आवाहन केलेले होते.राष्ट्रवादी कॉंग्रेस,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुखेड यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते,यावेळी उपस्थित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील जाधव साहेब,तालुका उपाध्यक्ष गंगाधर चामलवाड रामदास माळेगावे पाटील,बालाजी पाटील सांगवीकर,अमोल पाटील गोजेगाव, अमोल वाकोडे,संभाजी पाटील मुकणर,नीळकंठ पाटील बेळीकर,दत्ता पाटील इंगोले,प्रताप पाटील चौधरी जयभीम सोनकांबळे शादुल होंनवडजकर दिनेश पाटील केरूरकर, मगदूम खान,माधव पाटील होंनवडजकर,राम पाटील जाहुरकर,मनोहर नागराळे सामजिक न्यायविभागचे कपिल जुनेकर तसेच अनेक राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील जाहूरकर यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही रक्तदान करत या मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here