Home पश्चिम महाराष्ट्र जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी आज मतमोजणीला सुरुवात     ...

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी आज मतमोजणीला सुरुवात       

104
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी आज मतमोजणीला सुरुवात        युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
पंढरपूर (२ मे) – पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे आज रविवार दिनांक २ मे २०२१ रोजी सकाळी ८.०० वाजलेपासून सुरु होणार आहे. या मतमोजणी केंद्रात सुरक्षिततेच्या व कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले , सहायक निवडणूक अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे उपस्थित होते.
मतमोजणीबाबत तसेच कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. मतमोजणी कक्षात संपूर्ण ठिकाणी औषध फवारणी करुन घ्यावी. कक्षातील विद्युत जोडण्यामध्ये कुठेही शॉर्टसर्किट होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. अग्निशमन दल, वैद्यकीय पथक कार्यरत ठेवावे तसेच पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मतमोजणी टेबल, आरोग्य कक्ष, पीपीई किट कक्ष, प्रसार माध्यम कक्ष यांची पाहणी करुन आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मतमोजणी टेबलवर नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्ड, पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. तसेच मतदान कक्षात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleनांदेड येथे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न – १०७ बाटल्या रक्त संकलीत
Next articleगावात उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा हस्तगत करुन कोविड सेंटर सुरू करा तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here