Home नांदेड कोरोना covid-19 खबरदारीसाठी गावभर सँनिटाईजर फवारणी उपक्रम…

कोरोना covid-19 खबरदारीसाठी गावभर सँनिटाईजर फवारणी उपक्रम…

117
0

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना covid-19 खबरदारीसाठी गावभर सँनिटाईजर फवारणी उपक्रम…

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर तालुक्यातील मौजे नरंगल ( बु. ) हे गाव महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर वसलेले आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रभाव या गावातील नागरिकांना सोसावा लागत आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी उच्चशिक्षित सरपंच प्रा.सौ.शोभा अरविंद कर्णे व उपसरपंच सौ.आश्विनी रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावाची कोरोनापासून खबरदारी म्हणून गावभर सँनिटाईज करण्याचा उपक्रम राबविण्यात आले .
तरूणांच्या संकल्पनेतून गावाचा विकास करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी यांना गावातील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने सुविधा देण्यासाठी सूचना करण्यात आले. सँनिटाईजरची फवारणी करण्यासाठी ट्रँक्टर , फवारणी पंप आणि पुरेशा मनुष्यबळाचा वापर करून करण्यात आले. लोकांना सुरक्षित राहण्यासाठी प्रसार माध्यमातून जागरूकता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकांना मास्क , सँनिटाईजर , सुरक्षित अंतर या सूचना वारंवार दिले जात आहे. या गावात मागील कांही दिवसापासून मृत्यू चे प्रमाण वाढत असल्याने हे खबरदारी चे उपाय अंमलात आणले . या उपक्रमासाठी सरपंच प्रा.सौ.शोभा कर्णे , उपसरपंच आश्विनी पाटील , सदस्य सौ.शिल्पा संतोष पाटील , बालाजी पाटील धुप्पेकर , सौ.शोभा पाटील , सौ.सुरेखा आमटे , रामा कांबळे , सौ.अंजनबाई गायकवाड , डोंगरे द्रोपदाबाई , वैभव कांबळे यांनी पुढाकार घेऊन हे कार्य केले.

Previous articleखेड तालुक्यातील असगणी गावतील महादेव मंदिराच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा संपन्न 🛑
Next articleनांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर – पालकमंत्री अशोक चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here