• Home
  • पवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री

पवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210322-WA0019.jpg

🛑 पवारांच्या निवासस्थानी मोठी घडामोड; संजय राऊतांना डावलून बैठकीत काँग्रेस नेत्याची एंट्री 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली :⭕ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सक्रिय झाले आहेत.

त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादीची बैठक होत असून या बैठकीपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला आले होते. मात्र शरद पवारांनी त्यांना पाच मिनिटांचा वेळ देऊन रवाना केले.

राष्ट्रवादीच्या बैठकीत केवळ पक्षाचे नेतेच हजर राहतील, अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती होती. मात्र संजय राऊत पवारांच्या घराबाहेर पडताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवारांच्या घरी दाखल झाले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे.

तर दुसरीकडे कमलनाथ हे काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींचा महत्त्वपूर्ण निरोप घेऊन आल्याची माहिती पुढे आली आहे.

या सर्व घाडामोडींवरून पवारांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही तरी शिजतेय अशी माहिती पुढे आली आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment