राजेंद्र पाटील राऊत
डीवायपी टेक्निकल कॅम्पसच्या
सौरभ गुरवची एल-कॉममध्ये निवड
कोल्हापूर : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ.डी.वाय.पाटील टेक्निकल कॅम्पस मधील सौरभ गुरव या विद्यार्थ्याची एल-कॉम कंपनीमध्ये निवड झाली. कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे ही निवड झाली आहे.
एल-कॉम ही इलेक्ट्रोनिक्स अँड डेटा कम्युनिकेशन क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.वायर्ड आणि वायरलेस कनेक्टीव्हीटी उत्पादन निर्मितीमधील ही आघाडीची कंपनी आहे.या कंपनीच्या एच.आर. विभागाचे प्रमुख नागेंद्र कोटकर यांच्या उपस्थितीत प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये इलेक्ट्राॅनिक्स अँड कम्युनिकेशन विभागाच्या सौरभ गुरव याची निवड करण्यात आली.
यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ.एस. आर.पावसकर,टीपीओ प्रा.संग्राम मेथे,ऐश्वर्या संकपाळ,प्रणील मेंगाणे, रोहित केर्लेकर,स्नेहल फरांडे, सुजाता जगताप,प्रमोद सुतार उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील,कोल्हापूरचे पालकमंत्री व उपाध्यक्ष ना.सतेज पाटील,विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,कार्यकारी संचालक डॉ.ए. के.गुप्ता यांनी सौरभच्या निवडीबद्दल अभिनंदन केले.
युवा मराठा न्युज नेटवर्क .