राजेंद्र पाटील राऊत
चावरेत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप
कोल्हापूर : चावरे ता. हातकणंगले संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप प्रसंगी सदस्य सचिन चव्हाण, तलाठी पवण सुतार, सरपंच शारदा गुरव, ग्रामसेवक व्ही.डी.बोराडे प्रकाश चव्हाण,अमोल सुर्यवंशी आदी.
शासनाच्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिन चव्हाण यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे,मंडळ अधिकारी अनिता खाडे यांच्या प्रयत्नातून प्रकाश बहुउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती योजनेतील दिव्यांग, विधवा, निराधार लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
तलाठी पवण सुतार यांनी स्वागत करुन योजनेची माहिती दिली. प्रकाश बहुउद्देशीय कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी लाभार्थींना प्रति महिना एक हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामसेवक व्ही.डी.बोराडे, कृषि सहाय्यक अजय भंडारी, अमोल सुर्यवंशी उपस्थित होते. अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी आभार मानले.
युवा मराठा न्युज नेटवर्क .