राजेंद्र पाटील राऊत
आदिवासी कोळी महादेव जमातीचा वाघबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला( संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) नायगाव नगरीमध्ये आदिवासी कोळी महादेव समाजाचा महत्त्वाचा सण मानला जाणारा, वाघबारस हा सण पूर्वीपासून वडिलोपार्जित परंपरागत चालत असल्यामुळे हा सण मोठ्या मानाचा समजला जातो. म्हणून हा सण मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माधव आप्पा बेळगे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शरद भालेराव उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, हनुमंत बोईनवाड नगरसेवक नायगाव, व सय्यद रहीम शेठ माजी सभापती पंचायत समिती नायगाव, वीरभद्र मिरेवाड सर, नायगाव चे युवा नेते भगवान पाटील चव्हाण, प्रशांत गड्डमवार, शंकर मदेवाड व नायगाव नगरीचे असंख्य कार्यकर्ते व सर्व कोळी समाज बांधव मोठ्या हजारो संख्येने उपस्थित होते.




