Home नांदेड मुखेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी संपन्न…

मुखेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी संपन्न…

109
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांच्या निवडी संपन्न…
मुखेड ता. प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दि. 7 फेब्रुवारी 2021 रोजी कमळेवाडी फाटा मुखेड येथे भारतीय जनता पक्षाची बैठक संपन्न झाली. बैठकीत भावी काळात मुखेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी पक्षाची ध्येयधोरणे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष डॉ. वीरभद्र हिमगिरे यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची निवड केली आहे. यामध्ये युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी बालाजी पाटील सकनुरकर यांची निवड करण्यात आली वैद्यकीय आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. प्रवीण कुमार गव्हाणे यांची निवड करण्यात आली तर मुखेड शहराध्यक्षपदी किशोर सिंह चव्हाण तर राजकुमार बामणे शिवकुमार बंडे संदीप काळे यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर विनोद दंडल वाड यांची शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून भाजपा ता. उपाध्यक्षपदी सावरमाळ येथील विजय कुमार स्वामी येथील दत्ता पाटील मुधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली व मुजाहेद चोंडिकर यांची युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली तसेच व्यंकटराव जाधव वसूरकर यांची भाजपा ता. सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली यावेळी डॉ. माधव पाटील उच्चे कर ,अशोक गजलवाड ,खुशाल पाटील उमरदरीकर, सुधीर चव्हाण, राजू पाटील उंद्रीकर भाजपाचे तालुका पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सदस्य, महिला आघाडी, सर्व शक्ती केंद्रप्रमुख ,बूथ प्रमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here