Home नांदेड मुखेड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे थकित तब्बल 15 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी...

मुखेड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे थकित तब्बल 15 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी उपकार्यकारी अभियंता एस एम नरवाडे यांच्याकडून वीजबिले भरण्याचे आवाहन..

143
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील वीज ग्राहकांकडे थकित तब्बल 15 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी उपकार्यकारी अभियंता एस एम नरवाडे यांच्याकडून वीजबिले भरण्याचे आवाहन..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील वीजग्राहकाकडे तब्बल 15 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे उपकार्यकारी अभियंता एस एम नरवाडे साहेब यांनी माहिती दिली आहे. दिनांक 7 फेब्रुवारी 2021रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील वीजग्राहकाकडे तब्बल 15 कोटी 88 लाख 25 हजार रुपयांची थकबाकी येणे असल्याची माहिती कार्यालय प्रमुख उपकार्यकारी अभियंता एस. एम. नरवाडे यांनी दिली आहे. यामध्ये घरगुती वापरातील 9 कोटी 19 लाख 87 हजार रुपये तर कृषी पंप 7124 वीज ग्राहकांकडे 1 कोटी 92 लाख रुपये सार्वजनिक पथदिवे 249 ग्राहकाकडे 2 कोटी 33 लाख व शहर व ग्रामीण पाणीपुरवठा 1 कोटी 49 लाख रुपये थकित वीज बिल असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता एस एम नरवाडे साहेब यांनी दिली. सर्व तालुक्यातील लाउडस्पीकर च्या सहाय्याने वीज बिलाचा भरणा करा असे आवाहनही करण्यात येत असून त्यानुसार ग्राहकांनी आपली वीज बिले भरून सहकार्य करावे अन्यथा काही दिवसाच्या आत वीजपुरवठा खंडित करण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंता मुखेड एस.एम. नरवाडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here