राजेंद्र पाटील राऊत
गुन्हेगाराला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेल बाहेर आतषबाजी
पुणे: सराईत गुन्हेगाराला वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी येरवडा जेलच्या तुरुंगाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आहे. तसेच याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सराईत गुन्हेगार आकाश कंचीले याच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी त्याच्या समर्थकांनी येरवडा तुरुंगाबाहेर फटाक्याची आतषबाजी केली.
आकाश कंचीले याच्यावर खून, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहे. लॉकडाऊन काळात आकाश कंचीले आणि त्याच्या टोळीने येरवडा तुरुंगातून सुटलेल्या नितीन कसबे याचा खून केला होता. खूनाच्या गुन्ह्यात आकाशला अटक करण्यात आली असून तो येरवड्यात शिक्षा भोगत आहे.
युवा मराठा न्युज नेटवर्क.




