• Home
  • तुषार गावडेची असिस्टंट कमांडंट पदी निवड

तुषार गावडेची असिस्टंट कमांडंट पदी निवड

 

कोल्हापूर : संघ लोकसेवा आयोगच्या परीक्षेत नवे पारगाव (ता.हातकणंगले ) येथील तुषार तानाजी गावडे याने असिस्टंट कमांडंट पदी यश मिळवले.देशातील ३३० विध्यार्थ्यांत १५२ वा क्रमांक मिळवला. पदाचे यश मिळवले.
तुषार चे प्राथमिक शिक्षण नवे पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पाराशर हायस्कूल मध्ये झाले. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन राहुरीच्या महात्मा फुले कृषी महाविद्यालयातून त्याने कृषी अभियांत्रिकी पदवी घेतली.पदवी नंतर दिल्ली येथे तीन वर्षे अभ्यास केला. त्याने चौथ्या प्रयत्नात यश मिळविले. लॉकडाउनमध्ये घरी राहून अभ्यास करून यश मिळवले.तुषारचे वडील पारगाव च्या पाराशर टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक असून आई गृहिणी आहेत.वडिलांचे पाठबळावर आपण यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया तुषारने व्यक्त केली. तुषार च्या यशाची बातमी गावात कळताच तुषार वर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment