• Home
  • डॉ शितल कुरुडे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा सन्मानपत्र जाहीर

डॉ शितल कुरुडे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा सन्मानपत्र जाहीर

राजेंद्र पाटील राऊत

डॉ शितल कुरुडे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा सन्मानपत्र जाहीर

नांदेड, दि.२७ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी माजी आमदार कंधार, भाई गुरूनाथराव कुरूडे यांची नात व उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार चे अध्यक्ष भाई दत्तात्रय कुरूडे यांची जेष्ठ कन्या डॉ शितल कुरुडे यांनी संपूर्ण देश एकजुटीने कोविड 19 या जागतिक महामारीच्या विरोधात लढत असताना अशा कठीण परिस्थितीत आपल्या तालुक्यातील व गावातील लोकांना आपल्याच परिवारातील एक व्यक्ती समजून सामाजिक व तसेच वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले.
आपल्या समाज सेवेच्या भावनेतून सामाजिक व वैद्यकीय सेवा देत असतानाच विशेष बाब म्हणजे कोरोणा महामरीच्या संकट काळात रुमाल, मास्क, साबण, सेनिटायझर, अन्न धान्य या जीवनावश्यक वस्तूसह korona प्रतिबंधक उपाय म्हणून आर्सेनिक अल्बाम ३० या औषध गोळ्या वाटप समवेत आपल्या परिसरातील गोर गरीब लोकांना मोफत वैद्यकिय सेवा प्रदान कण्याचे कार्य केले व लॉकडाऊन च्या संकट काळात कोविड १९ च्या विरोधात एक योद्धा प्रमाणे लढा दिले.
याच उल्लेखनीय कार्याची दखल घेत महात्मा कबीर समता परिषदेने दिनांक ७ फेब्रु. २०२१ रोजी सकाळी ११ वा. डॉ.शंकरराव चव्हाण सभाग्रह नांदेड येथे, डॉ शितल कुरुडे यांना राज्यस्तरीय कोरोना सेवा योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्याचे जाहीर केले.
राज्यस्तरीय कोरोना योद्धा सन्मानपत्र जाहीर झाल्याचे समजताच डॉ शितल कुरुडे यांचे
सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

anews Banner

Leave A Comment