राजेंद्र पाटील राऊत
नांदेड येथे अर्णब गोस्वामिंच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली तीव्र निदर्शने
नांदेड, दि.२५- राजेश एन भांगे युवा मराठा न्युज
टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या बार्क माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दास गुप्ता यांच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलिसांना दास गुप्ता व अर्णब गोस्वामी यांच्यासोबत व्हाट्सअप वर झालेल्या संभाषणाची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र झळकत आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या ४० जवानांचा मृत्यू झाल्यानंतर अर्णब यांना झालेला आनंद देशद्रोहाचा गुन्हा चालवण्यासाठी पुरेसा आहे. देशहिताला दुय्यम समजून स्वतःच्या स्वार्थाकरिता देशाची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या अशा देशविघातक कृत्य करणाऱ्या विरोध सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मरकास पुष्प अर्पण करून तीव्र स्वरूपात निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम, मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रशांत कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, शुभम जटाळ, कल्पना डोंगळीकर, डॉ. मुजाहिद खान, श्रीधर नागापूरकर, सचिन जाधव, प्रश्नांत कदम, गणेश तादलापुरकर, युनूस खान, शफी रहमान, धनंजय सूर्यवंशी, फैसल सिद्दिकी, प्रसाद पवार, गजानन कराळे,मो.दानिश, विजय मोरे, रोहित पवार,महेश कल्याणकर, अजय मुंगल, जिलानी पटेल, मोहम्मदि पटेल इत्यादी संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.